शेठ न.म. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य टिळक पुण्यतिथी निम्मित प्राथमिक गटातील वक्तृत्व स्पर्धा संपन्न

1 ऑगस्ट 2023 या दिवशी लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक श्री सानप सर व प्रशालेतील शिक्षक यांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रशालेतील शिक्षक श्री जाधव सर, ज्येष्ठ शिक्षक श्री वारंगे सर, श्री गुरसाळे सर,श्री कोकाटे सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक उपस्थित होते. यानंतर रायबागकर सभागृहात लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त शिशुविहार व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षक पालक संघाच्या प्रतिनिधी सौ ठाकूरदेसाई मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. शिशुविहार व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला व आपली भाषणे केली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे उपस्थित होते. आपल्या मनोगतात त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. मोठ्या उत्साहात वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रशालेतील शिक्षक श्री कापसे सर व श्री हरयाण सर यांनी काम पाहिले.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!