पळसंब गावात खरीप हंगाम पंधरावडा संपन्न

आचरा– अर्जुन बापर्डेकर
ज़िल्हा परिषद शाळा पळसंब येथे खरीप हंगाम पंधरवडा कार्यक्रमा निमित्त बीज प्रकिया कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी विविध कृषीविषयक योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला
मंडळ कृषी अधिकारी आचरा कांबळे कृषी प्रवेक्षक सावंत कृषी सहाय्यक शिंदे, कुरकुटे ,यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच महेश वरक साहेब उपसरपंच अविराज परब ग्रामपंचायत सदस्य. व शेतकरी उपस्थित होते, यावेळी कृषि विभागाच्या विविध योजना सांगण्यात आल्या माती परीक्षण, शेतकरी मासिक, फळबाग लागवड, पिक विमा, भातपीक स्पर्धा, कृषि यांत्रिकीकरण यावर मार्गदर्शन तसेच सखोल प्रात्यक्षिक करून दाखविण्यात त्यानंतर उपस्थिताचे आभार मानून कार्यक्रम संपविण्यात आला .