कोकण नाऊ मालवण महोत्सवात ३१ मे रोजी रंगणार कोकण नाऊ सुंदरी स्पर्धा

प्रतिनिधी । मालवण : कोकण नाऊ आयोजित मालवण महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मालवणवासियांना अनुभवायला मिळणार आहे. हा महोत्सव 25 मे ते 31 मे या कालावधीत मालवणच्या बोर्डिंग मैदानावर होत आहे. खाद्य महोत्सव आणि घरगुती वस्तूंचे भव्य प्रदर्शन व विक्री याबरोबरच ऑटो एक्सपो मनोरंजन जत्रा असे या महोत्सवाचे स्वरूप असणार आहे. बुधवार दि. ३० मे रोजी कोकण नाऊ सुंदरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ मे हा या महोत्सवाचा अखेरचा दिवस असून या दिवशी कोकण नाऊ सुंदरी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्याला पाच हजार रुपये, द्वितीय विजेत्याला तीन हजार रुपये व तृतीय विजेत्याला दोन हजार रुपयांची पारितोषिक देण्यात येणार आहे. एकूण तीन फेऱ्यांमध्ये हे स्पर्धा होणार आहे. पहिली फेरी पारंपरिक वेशभूषा आणि ओळख, दुसरी फेरी टॅलेंट राऊंड असेल. यात गाणे, नृत्य, वक्तृत्व असे टॅलेंट सादर करावे लागेल. तिसरी फेरी पाश्च्यात्य पोशाख आणि परीक्षक प्रश्न फेरी असेल.
“कोकण नाऊ चॅनेल ने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी 9370440893 / 9422434260 यां संपर्क क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन कोकण नाऊच्या संचालिका वैशाली गावकर यांनी केले आहे.