जलजीवन मिशनच्या त्रुटींच्या आढाव्या करीता आमदार नितेश राणे घेणार बैठका

31 मे रोजी देवगड तालुक्याची बैठक
जनतेने या योजने संदर्भातील तक्रारी असल्यास मांडाव्यात
केंद्र सरकारने व पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवठा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यांना निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून महाराष्ट्र सरकारने “जल जीवन मिशन” या कार्यक्रमाद्वारे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नळपाणी पुरवठा योजनांच्या कामांना सुरूवात केली आहे.
सद्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून येत आहेत. गावा गावातून अनेक तक्रारी येऊ लागल्याने कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यानी या योजनेच्या कामांचा आढावा घ्यायचा निर्णय घेतला असून मतदारसंघातील तीनही तालुक्यांमध्ये आढावा बैठकांचे आयोजन केले आहे. त्यानुसार दिनांक ३१ मे २०२३ रोजी देवगड तालुक्याची आढावा बैठक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंद्रप्रस्थ हॉल जामसंडे ता. देवगड येथे सकाळी ११.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
तरी या आढावा बैठकीला देवगड तालुक्यातील जनतेने गावातील जल जीवन मिशन योजनेमध्ये काही तक्रारी असल्यास त्या मांडून तक्रार निवारण करून घ्यावे असे आवाहन आमदार नितेश राणे यानी केले आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली