राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३० तारखेला सावंतवाडीत येणार

मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती
विकास कामांचे भूमिपूजनहोणारं
सावंतवाडीकरांकडून नागरी सत्कार
सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी शहरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या भूमिपूजनासाठी ३० तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. यावेळी त्यांचा सावंतवाडीकरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.