वंदे भारत ट्रेनला कणकवलीत कायमस्वरूपी थांबा हवा

कलमठ शिवसेना शहर प्रमुखांची मागणी
कणकवली ब्युरो न्यूज
कोकण रेल्वे मार्गावर वंदे मातरम ट्रेनला कणकवलीत कायमस्वरूपी थांबा मिळावा अशी मागणी शिवसेना कलमठ शहर प्रमुख प्रशांत वनस्कर यांनी रेल्वे स्थानकाच्या स्थानक प्रमुखांची भेट घेत निवेदनाद्वारे केली आहे
एकूणच सर्व बाजूंनी विचार करता कणकवलीचे महत्त्व पाहता कणकवलीला वंदे भारतचा थांबा देणे अधिक श्रेयस्कर व आवश्यक आहे याकडे यावेळी चर्चे प्रसंगी वणस्कर यांनी स्थानक प्रमुखांचे लक्ष वेधले
याखेरीज कणकवली रेल्वे स्टेशन मध्ये येईल महिलांसाठीचे स्वच्छतागृह अपुरे आहे ते अध्यायावत करावे आणि कोकण कन्या व तुतारी या गाड्यांना महिला डबे जोडावेत अशी मागणी ही प्रशांत वनस्कर यांनी यावेळी केली
आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचविल्या जातील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी यावेळी दिले