सावंतवाडी शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना विचारला जाब

सावंतवाडी
सद्यस्थितीत अति उष्णता आहे त्यात लग्नसराई खरेदी व इतर व्यवसायिकांचा सीजन असूनही वारंवार विद्युत पुरवठा खंडित होऊ लागल्याने शहरातील सर्व व्यापारी वर्ग व नागरिक त्रस्त आहेत जागतिक मंदीचे धंद्यावर सावट आहे. त्यात वारंवार होणारा खंडित विद्युत पुरवठा याचा परिणाम सर्वच व्यवसायिकांवर होत आहे. मान्सून काहीच दिवसांवर येऊन ठेपला असून अद्यापही विद्युत वाहिनीच्या वरील झाडांच्या फांद्या तोडण्यात आलेल्या नाहीत याकडे लक्ष वेधले असता सावंतवाडी कोलगाव सब स्टेशन वरून येणाऱ्या विद्युत वाहिनीवर वाढलेली झाडी तोडण्याकरिता पीडब्ल्यूडी ला आपण पत्रव्यवहार करावा असे महावितरण च्या अधिकाऱ्यांना सुचविण्यात आले. त्यावर महावितरणच्या अभियंतांनी लवकरात लवकर पावसाळ्यापूर्वी विद्युत वाहिन्या निगडित सर्व कामे पूर्ण करून घेऊ व सावंतवाडी शहरात होणारा खंडित विद्युत पुरवठा सुरळीत ठेव अशी हमी दिली.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष उद्योग व्यापार हिदायत खान अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष इफ्तेकार राजगुरू सरचिटणीस राकेश नेवगी अल्पसंख्यांक सदस्य रज्जब खान आदी उपस्थित होते.