मसुरे श्री देव जैन भरतेश्वर मंदिर कलशारोहण 13 मे रोजी प्रथम वर्धापन दिन

कसबा मसुरे गावचे ग्रामदैवत 360 खेड्यांचा अधिपती मसुरे देऊळवाडा येथील श्री देव जैन भरतेश्वर मंदिराचा प्रथम कलशारोहण वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाने संपन्न होणार आहे. यावेळी सकाळी 7.30 वाजता होम हवन विधी सह धार्मिक कार्यक्रमास सुरुवात, दुपारी १२.४५ शाही पालखी सोहळा, दुपारी एक वाजता महाआरती, दुपारी एक ते तीन महाप्रसाद, दुपारी तीन ते साडेसहा स्थानिक सुस्वर भजने, सायंकाळी ७.३० वाजता शाही पालखी सोहळा, रात्री आठ वाजता महाआरती, रात्री 10 वाजता श्री देवभरतेश्वर मंदिर नाट्य मंडळ मुंबई यांचे ‘माझ्या मना’ हे सामाजिक नाटक सादर होणार आहे.सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव भरतेश्वर मंदिर ट्रस्ट च्या वतीने करण्यात आले आहे.

मसुरे प्रतिनिधी

error: Content is protected !!