जिल्ह्यातील खेळाडूंना बॉक्सिंग चे मोफत प्रशिक्षण शिबीर

जिल्हा क्रीडा अधिकारी व हौशी बॉक्सिंग संघटनेच्या वतीने आयोजन
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटना यांचे संयुक्त विद्यमाने बॉक्सिंग या खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिर जिल्हा क्रीडा संकुल ,ओरस येथे सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटनेचे सचिव डॉ राजाराम दळवी, श्री एकनाथ चव्हाण ,मुख्य बॉक्सिंग प्रशिक्षक सिंधुदुर्ग जिल्हा आणि श्री स्वप्निल चव्हाण इंटर कॉलेज बॉक्सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. मा. जिल्हा क्रीडा अधिकारी सौ विद्या शिरस यांचे अध्यक्ष खाली झालेल्या शिबिराचा समारोप समारंभामध्ये महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री भरत कुमार व्हावळ यांनी सर्व बॉक्सिंग खेळाडूंना व पालकांना बॉक्सिंग या खेळापासूनचे फायदे याबाबत मार्गदर्शन केले तसेच सर्व 27 शिबिरार्थी खेळाडू मुले व मुली यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले .सर्व पालक तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या आग्रहानुसार यापुढेही जिल्हा क्रीडा संकुल ओरस येथे कायमस्वरूपी बॉक्सिंग या खेळाचे प्रशिक्षण शिबिर चालू राहील असे डॉ. राजाराम दळवी सचिव व श्री एकनाथ चव्हाण मुख्य बॉक्सिंग प्रशिक्षक सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटना यानी जाहीर केले . कोणालाही बॉक्सिंगचे प्रशिक्षण घ्यायचे आहे किंवा पंच म्हणून काम करायचे आहे त्यानी डॉ राजाराम दळवी सचिव मोबाईल नंबर ९८६७३७८७३४ व मुख्य बॉक्सिंग प्रशिक्षक श्री एकनाथ चव्हाण मोबाईल नंबर ८१०८७५३६२६ यांच्याशी संपर्क करावा.
सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बॉक्सिंग संघटने आयोजित श्री भरत कुमार व्हावळ उपाध्यक्ष महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना व श्री एकनाथ चव्हाण मुख्य बॉक्सिंग प्रशिक्षक सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंगचे जिल्हास्तरीय पंच शिबिर दिनांक 27 एप्रिल 2023 रोजी जिल्हा क्रीडा संकुल ओरस येथे पार पडले या शिबिरास 17 पालक व क्रीडा शिक्षक उपस्थित होते पंचांची बॉक्सिंग खेळा दरम्यानची भूमिका व कर्तव्य याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करण्यात आले.
कणकवली प्रतिनिधी





