आयडियल इंग्लिश स्कूल कणकवली आणि ज्यूनियर कॉलेज यांच्या वतीने स्केटिंग आणि स्विमिंग कॅम्प चे आयोजन.

कणकवलीतील विद्यार्थ्यांचा लाभतोय उस्फूर्त प्रतिसाद.

कणकवली/मयुर ठाकूर.

ज्ञानदा शिक्षण संस्थेचे आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्यूनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स यांच्या वतीने वर्षभरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांच आयोजन करण्यात येतं, याच धर्तीवर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून स्केटिंग आणि स्विमिंग कॅम्पचे आयोजन आयडियल इंग्लिश स्कूलच्या वतीने करण्यात आले आहे.या कॅम्पचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले.
स्केटिंग सेमिनार साठी उद्घाटक संस्थेचे सचिव श्री प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,संस्थेचे कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल तसेच सौ अर्चना देसाई (मुख्याध्यापक आयडियल कॉलेज), श्री सचिन पारधी (कळसुली सरपंच), श्री विजय चिंदरकर,सामंत सर, मृणाली सावंत आदी उपस्थित होते.
तसेच स्विमिंग सेमिनारसाठी श्री साजर पटेल हे उद्घाटक होते.तसेच प्रमुख उपस्थिती कार्याध्यक्ष श्री बुलंद पटेल,संस्थेचे सचिव हरिभाऊ भिसे,उपसचिव श्री महिंद्रकर सर, मुख्याध्यापिका सौ अर्चना देसाई मॅडम,तसेच सौ मोरवेकर मॅडम,जोशी मॅडम,जाधव मॅडम,खटावकर मॅडम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!