कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर व परबवाडी भागाकरीता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना द्या!

महादेव उर्फ हृतिक नलावडे यांची खासदार नारायण राणे यांच्याकडे मागणी

राणेंकडून अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना

कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर तसेच परबवाडी भागामध्ये कमी दाबाच्या वीज पुरवठ्याची गेले काही वर्ष सातत्याने समस्या असून ही समस्या सोडविण्याकरिता या दोन भागांकरिता स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या सूचना महावितरण ला द्या अशी मागणी महादेव उर्फ हृतिक सचिन नलावडे यांनी खासदार नारायण राणे यांच्याकडे केली आहे. येथील संपर्क कार्यालयात श्री राणे यांची भेट घेत नलावडे यांनी ही मागणी केली. याबाबत वीज अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देण्यात आल्या असून तात्काळ कार्यवाही करा असे राणे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यामुळे लवकरच या भागातील ही समस्या मार्गी लागेल अशी माहिती श्री. नलावडे यांनी दिली.

error: Content is protected !!