आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले

आचरा येथील नाभिक बांधवांची पणदूर येथील सविता आश्रमात सेवा

वृद्धांचे केली केस दाढी करून केली सेवा

आपण समाजाचे काही देणं लागतो.याऋणातून काही प्रमाणात का होईना उत्तराई व्हावे वृद्धांची सेवा करावी या भावनेतूनच आचरा येथील बालगोपाळ मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून पणदूर येथील सविताश्रमात गुरुवारी भेट देत तेथील वृद्धांची मोफत केस दाढी करुन सेवा करत समाजासमोर एक आदर्श ठेवला. तसेच मंडळाकडून त्यांना आवश्यक जीवनावश्यक वस्तूचेही वाटप करण्यात आले.
बालगोपाळ मंडळाच्या युवकांच्या यासेवेने वृद्धांचे हास्य मात्र पुन्हा फुलले. पणदूर येथील सविताश्रमातील वृद्ध पुरुष /महिला यांची आचरा येथील श्री बाळगोपाळ मंडळातील नाभिक बांधव यांच्या कडून केस दाढी करून सेवा करण्यात आली.त्यांनी केलेल्या या आगळ्या सेवेबद्दल आश्रमाचे संस्थापक संदीप परब यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच बालगोपाळ मंडळातर्फे आश्रमात लागणा-या रोजच्या जेवणासाठी आवश्यक वस्तू ही देण्यात आल्या. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मंदार आचरेकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर यांच्या सह मंडळाचे सर्व सदस्य महिला वर्ग बहुसंख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!