सावंतवाडी शाळा नंबर ४ अंगणवाडीचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

सरिता संजय भिसे आणि अक्षता अमित कुडतरकर यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान
सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी शहरातील अग्रमानांकित जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नंबर चार अंगणवाडी मध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.बालकांच्या सर्वांगीण प्रगती करिता सदर कार्यक्रमात शिक्षक वर्ग व अंगणवाडी समिती यांनी नियोजनबद्ध करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात सहभागी होत सर्व खेळांचा मनमुराद आनंद बालकांनी घेतला, पालकांकरिताही पाक कलेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे अवचित्त्त साधून अंगणवाडी सेविका श्रीमती सरिता भिसे व मदतनीस श्रीमती अक्षता कुडतरकर यांच्या गौरवास्पद कार्याची दखल घेत मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर,वरिष्ठ जिल्हाध्यक्ष श्री संतोष तळवणेकर सिंधुदुर्ग जिल्हा, यांच्या पाठपुरव्यामुळे ,भारत श्री, आदर्श शिक्षिका पुरस्कार व सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमात अंगणवाडी समिती अध्यक्ष माननीय श्री सुरेश विर्नोडकर,एकात्मिक बालविकास सेवा योजना सावंवाडीतीच्या मा.प्रकल्प अधिकारी श्रीमती संध्या मोरे,मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे प्रदेश सचिव श्री अमित वेंगुर्लेकर वरिष्ठ जिल्हाध्यक्ष श्री संतोष तळवणेकर अंगणवाडी समिती उपाध्यक्ष श्रीमती लतिका सिंग सिंग, श्री.केशव जाधव सर,श्री.अमर पाटील सर, मुख्याध्यापक श्री. पावरा सर,सिंधुदुर्ग जिल्हा बँक सावंतवाडी शाखा व्यवस्थापक श्री.शरद सावंत,विलास सावंत,कांचन विरनोडकर,कविता धुरी,सुजाता पवार,दिशा सावंत,सांचीता गावडे,महेश पांचाळ तसेच इतर ग्रामस्थ,पालक कमिटी सदस्य सादर कार्यक्रमाला उपस्थित होते.