कलमठ ग्रामपंचायतचा चिमुकल्यांसाठी समर कॅम्प चा अनोखा उपक्रम

मुलांमधील कलागुणांना ग्रामपंचायत देणार व्यासपीठ

समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ पहिली ग्रामपंचायत

कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून. २ दिवस चालणाऱ्या या कॅम्प मध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन तज्ञ कंरणार आहेत. यामध्ये सांगित संवाद- सांगित विशारद प्रियंका मुसळे, रंगरेषा -कला शिक्षक प्रवीण चिंदरकर, हनुमत ताँबट सर,क्राफ्टिंग-हरिश्चंद्र सरमळकर, स्वसरंक्षण- भालचंद्र कुलकर्णी, अभिनय ,संवाद कौशल्य, व्यक्तिमत्व विकास- नीलेश पवार सीने अभिनेते,योगा प्रशिक्षण- प्रमोद लिमये,हस्ताक्षर मार्गदर्शन- अभिजीत राणे सर,मातीकला-कृष्णा गोठनकर, नृत्य प्रशिक्षण- एसके डांस अकादमी, स्वच्छता विषयक जनजागृति व संवाद- संदिप पवार, स्वच्छ भारत मिशन अश्या तज्ञ मार्फत मार्गदर्शन मिळणार असून २० एप्रिल पर्यंत नाव नोंदणी करावी व अधिक माहिती साठि श्रीकांत बुचड़े सर, प्रमोद पवार सर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायत कलमठच्या वतीने करण्यात आले आहे.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!