कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्याकडून बालोद्यानासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीचे अभिनंदन

कुडाळ : कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी कुडाळ शहरामध्ये होत असलेल्या बालोद्यानासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीचे अभिनंदन केले आहे. त्याबद्दल कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सुद्धा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी केलेल्या सूचनांची सुद्धा आम्ही भविष्यात पूर्तता करणार आहोत, असे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी
म्हटले आहे.
कुडाळचे माजी नगराध्यक्ष झालेल्या विकासकामांचे अभिनंदन करत असताना सध्या विरोधी पक्षात असलेले काही नगरसेवक मात्र या चांगल्या विकासकामात सहभागी न होता राजकारण करत आहेत. अशाप्रकारची वृत्ती नक्कीच कुडाळ शहर विकासासाठी चांगले नाही, असे महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी म्हटले आहे.

प्रतिनिधी, कुडाळ

error: Content is protected !!