कॉकरोज जनता पार्टीच्या नावाखाली भाजपा कार्यकर्त्यांच्या नावाच्या फेक पोस्ट

भाजपा युवा मोर्चा शिष्टमंडळाची पोलिसांत तक्रार

तातडीने कारवाई करा अन्यथा भाजपा युवा मोर्चा पुढील पाऊल उचलणार

Chockroch Janata Party” या इन्स्टा पेजवरून भारतीय जनता पार्टीच्या सक्रिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटो वापरून “Chockroch Janta Party” या पक्षाचे पदाधिकारी असल्याप्रमाणे खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पोस्ट तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या पोस्ट सोशल मीडियामध्ये सातत्याने प्रसारित होत असल्याने आमची सामाजिक बदनामी होत असून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रकारची तक्रार भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कणकवली पोलिसांकडे देण्यात आली आहे. या निवेदनामध्ये पुढे म्हटले आहे, समाजामध्ये गैरसमज निर्माण होऊन आमच्या प्रतिमेला धक्का पोहोचत आहे. तरी सदर प्रकाराची सखोल चौकशी करून या बदनामीमागे असणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेण्यात यावा व त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा, ही नम्र विनंती.
तसेच भविष्यात अशा प्रकारचे कृत्य पुन्हा होऊ नये यासाठी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अन्यथा अशा समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्हाला पुढाकार घ्यावा लागेल असा इशारा या शिष्टमंडळाच्या वतीने युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांनी दिला आहे. यावेळी ऋतिक नलावडे भालचंद्र वरवडेकर सागर राणे प्रशांत राणे तुषार मोरये ओमकार सुतार श्रेयस चिंदरकर नितीन पवार चेतन पवार रोहित ठाकूर गोपाळ बागायतकर स्वप्निल वर्दम गणेश तळेगावकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!