सिंधुदुर्गात अवैध धंद्यांना पोलिसांचा पाठींबा?

आमदार निलेश राणेंच्या पोस्टने खळबळ
पत्रकार परिषदेत करणार खुलासा
सिंधुदुर्गच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. आमदार निलेश राणे यांनी सोशल मीडियावर एक गंभीर आरोप करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत आणि त्या धंद्यांना पोलिस प्रशासनाकडून पाठबळ मिळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आमदार निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर म्हटले आहे की, “सिंधुदुर्गातील सर्व अनधिकृत धंदे आणि त्या धंद्यांना जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. दहिकर देत असलेला पाठींबा जनतेसमोर आणणार आहे.” तसेच येत्या दोन दिवसांत यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या पोस्टनंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, नेमके कोणते आरोप आणि कोणते पुरावे निलेश राणे पत्रकार परिषदेत मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






