केरळमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; 26 मे पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता

मान्सूनच्या स्वागतासाठी केरळ सज्ज; पावसाचा जोर कायम

मान्सूनची आगेकूच सुरू; दक्षिण भारतात पावसाचा इशारा

देवभूमी केरळमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोर धरला असून लवकरच नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या मान्सूनची प्रगती मध्य बंगालचा उपसागर, श्रीलंकेचा बहुतांश भाग तसेच अरबी समुद्राच्या काही भागांपर्यंत झाली असून तो भारतीय मुख्य भूमीकडे सरकत आहे.
भारतीय हवामान विभागाने 26 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील दोन दिवसांपासून केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून पुढील चार दिवसही ही स्थिती कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मान्सून आगमनाची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, केरळसोबतच कर्नाटक, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पूर्वोत्तर राज्यांमध्येही पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे विदर्भ, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट कायम असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!