बालोद्यानाचा लोकार्पण सोहळयात ‘लकी ड्रॉ’ची मजा !

लहान मुलांना लकी ड्रॉद्वारे सायकल जिंकण्याची सुवर्णसंधी

कुडाळ ; कुडाळ तहसीलदार कार्यालयानजिक नगरपंचायतीमार्फत नव्याने साकारण्यात आलेल्या बालोद्यानाचा लोकार्पण सोहळा उद्या सायं. ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. शहरातील लहान मुलांच्या मनोरंजनासाठी ७५ लाख रूपये निधीतून तहसीलदार कार्यालयानजीक सुसज्ज बालोद्यान प्रकल्प साकारण्यात आला आहे. याठिकाणी विविध खेळणी बसविण्यात आली असून या बालोद्यानाचे काम पूर्ण झाले आहे. उद्या सायं. ६ वाजता लहान मुलांचे फनी गेम्स आणि सायं. ७ वाजता लहान मुलांचे लकी ड्रॉ होईल. लकी ड्रॉ कुपन बालोद्यान येथे सायंकाळी ५.३० पासून मोफत उपलब्ध असतील. तसेच लकी ड्रॉ विजेत्यास सायकल बक्षीस देण्यात येईल. विजेता लकी ड्रॉवेळी उपस्थित असणे आवश्यक आहे. या लोकार्पण सोहळ्यास कुडाळवासीयांनी उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिनिधी, कोकण नाऊ, कुडाळ

error: Content is protected !!