भारतरत्न डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती समाजातील प्रत्येक घराघरांमध्ये दिवाळीप्रमाणे साजरी करा – जिल्हाध्यक्ष सुजित जाधव

संतोष हिवाळेकर पोईप

चर्मकार समाज उन्नती मंडळ मालवण शाखेच्या वतीने किर्लोस येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती
संत रविदास प्रतिष्ठान चव्हाणवाडी किर्लोस येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मालवण तालुका अध्यक्ष हरेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर माणगावकर, जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, सरपंच साक्षी चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ चव्हाण , प्रस्ताविक तालुका सरचिटणीस श्री संभाजी कोरे, प्रमुख मार्गदर्शक भंडारी हायस्कूल चे मुख्याध्यापक व्हि.जी.खोत तसेच उपाध्यक्ष निलेश पवार, संतोष हिवाळेकर ,सरचिटणीस संभाजी कोरे, मुरारी जांभळे विजय पाताडे,श्याम चव्हाण मंगेश चव्हाण, सौ शामल चव्हाण , कांचन नांदोस्कर ,सल्लागार वसंत चव्हाण, श्रीकृष्ण पाडगावकर ,बाळकृष्ण माणगावकर, बाळकृष्ण नांदोस्कर,
प्रकाश चव्हाण.किर्लोस प्रभाग अध्यक्ष उदयसिंग चव्हाण ,अर्जुन चव्हाण सचिन चव्हाण ,संदेश चव्हाण ,मेघना चव्हाण,आदि मान्यवर उपस्थित होते

यावेळी या कार्यक्रमाचे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला

यावेळी उपस्थितीत चर्मकार समाज बांधवांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी सांगितले की किर्लोस चर्मकार समाजने उभारलेल्या समाजमंदिर सभागृहासाठी उर्वरित काम करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या फडातुन 25लाखाचा निधी देण्याचे आश्वासन दिले तसेच आज मालवण तालुक्याने जो कार्यक्रम आयोजित केला तो खुप चांगल्या प्रकारे केला आहे असेच कार्यक्रम आयोजित करा व आपल्या समाज बांधवांना एकत्र आणण्याचे जे कार्य करताहेत ते सुंदर आहे माझ्या कडून जे सहकार्य लाभले ते मी करणार आहे
नुत्य केलेल्या त्या मुलांचे कौतुक केले आज आपण जे आहोत ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे त्या महामानवाला माझ्या ञिवार अभिवादन!

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी माहिती देताना मार्गदर्शक श्री व्ही.जी.खोत म्हणाले की बाबासाहेब यांनी आपला जीवनप्रवास कसा घडवला त्यांनी गरीबीतुन शिक्षण पुर्ण करत अनेक डिग्री प्राप्त केल्या हे नवीन पिढीने जाणुन घेतले .पाहिजे मुलांनो
शिका संघटित व्हा संघर्ष करा हेच बीद्र वाक्यं बाबासाहेबांचे होते. महिलांनी लढायला शिकले पाहिजे तसेच आपली मुलं शिकली पाहिजेत
आजच्या मुलांनी सोशल मीडियातुन बाहेर पडायला पाहिजे . मालवण चर्मकार समाज उन्नती मंडळ तालुक्याने जो कार्यक्रम आयोजित केला या स्तुत्य असा होता. कार्यक्रमास बहुसंख्येने समाजबांधव उपस्थित होते

error: Content is protected !!