स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत खारेपाटण एस टी बस स्थानकाची विभागीय समिती कडून पाहणी

हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बसस्थानक अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा च्या विभागीय समितीने नुकतीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण एस टी बसस्थानकाला भेट देऊन संपूर्ण बस स्थानकाची पाहणी केली.
या समितीचे प्रमुख असलेले महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळाच्या मुंबई सेंट्रल बसस्थानक येथील विभागीय नियंत्रक श्री. शिवाजी पाटील यांच्यासमवेत कणकवली आगार व्यवस्थापक श्री. अजय गायकवाड, कणकवली एस टी बस स्थानक प्रमुख श्रीनिवास कदम, सेवानिवृत्त खारेपाटण बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री. चंद्रकांत कांबळे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्री. संतोष पाटणकर, श्रीम. अस्मिता गिडाळे, प्रवासी मित्र श्री. तुषार कोळसुलकर, श्री सागर कल्याणकर, रिक्षा संघ प्रतिनिधी एस डी तुरळकर, खारेपाटण एस टी बस स्थानक वाहतूक नियंत्रक प्रमुख श्री. महेश राऊत आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन आयोजित स्वच्छ सर्वेशन – २०२६ अभियान दि. १३ मार्च २०२६ ते दि. २६ एप्रिल २०२६ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात असून या पार्श्वभूमीवर खारेपाटण एस टी बस स्थानक येथील एस टी बस स्थानक साफ सफाई कर्मचारी श्रीम. सुवर्णा रमेश पाटणकर यांनी स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी मेहनत घेतली. तर बस स्थानकाची पाहणी करण्यासाठी आलेल्या समितीने खारेपाटण एस टी बस स्थानक येथे असलेल्या सोयी सुविधा बाबत समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!