निशा शेलार यांना तेजस्वी फाउंडेशनचा सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेर्पे गावच्या माजी सरपंच,सामाजिक कार्यकर्त्या ,निशा शेलार -गुरव यांना यांच्या सामाजिक,शैक्षणिक,सेवाभावी कार्याची दखल घेऊन तेजस्वी फाउंडेशन ने त्यांची सावित्रीबाई फुले सेवाव्रती पुरस्कारासाठी निवड केली आहे.
तेजस्वी फाउंडेशनतर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ अंतर्गत निशा शेलार गुरव याना या पुरस्काराने ११ एप्रिल २०२६ रोजी ठाणे येथे सन्मानित करण्यात येणार आहे. निशा शेलार यांना या आधीही अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी सरपंच असताना अनेक कुटुंबाना गॅस वाटप,बेघरअसणाऱ्याना घर, २५००० रोपांची नर्सरी निर्माण करून त्याच वाटप,शाळेमध्ये शिक्षक मागणीसाठी शाळाबंद आंदोलन,जेष्ठ नागरिक कॅम्प,आधार कार्ड कॅम्प,अन्नपूर्णा केटरर्स गृह उद्योग,असे अनेक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे.त्यांच या पुरस्कार निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

error: Content is protected !!