कणकवलीत बांधकाम व्यवसायिकाचा खून?

डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत आढळला मृतदेह
कणकवली मधील बांधकाम व्यवसायिक असलेल्या सुशांत दळवी यांचा मृतदेह डोक्याला गंभीर इजा झालेल्या स्थितीत कणकवली मोहन मळा या भागात आढळून आला आहे. डोक्याला बंदुकीची गोळी लागलेल्या सदृश्य स्थितीत हा मृतदेह आढळल्याने हा घातपात की अन्य कसे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या बांधकाम व्यावसायिकेच्या डोक्यावर बंदुकीची गोळी लागावी अशा स्थितीत इजा झालेली आढळत आहे.





