सिंधुदुर्ग बॅडमिंटन लीग २०२६ मध्ये एस अटॅकर्स विजेते

कणकवली बॅडमिंटन क्लब आणि के एन के. स्मॅशर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती स्पर्धा स्पर्धेच्या ४ थ्या वर्षी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दोडामार्ग डायनामोस ने कणकवलीच्या केएनके स्मॅशर्स चा ३-२ ने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात कणकवलीच्याच एस अटॅकर्स ने दोडामार्ग डायमोसचा ३-१ ने पराभव करत विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील १५ वर्षांखालील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून हर्षद सानिये , सर्वोत्कृष्ट एकेरी खेळाडू म्हणून साईराज सामंत, सर्वोत्कृष्ट दुहेरी खेळाडू म्हणून ओंकार लोखंडे आणि कुणाल नारकर तसेच ४० वर्षांवरील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सच्चिदानंद नाईक आणि उदय जांभवडेकर यांना गौरवण्यात आले.
यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभात नगरसेविका मेघा गांगण, माजी नगरसेवक अजय गांगण, आनंद पोरे दिशांक काळसेकर, अंकिता कर्पे, संध्या पोरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विजेत्या संघास चषक श्री सिद्धेश तळगावकर यांजकडून व रुपये २५,००० माजी नगराध्यक्ष मा. समीरजी नलावडे यांजकडून तसेच उपविजेत्या संघास चषक श्री सिद्धेश तळगावकर यांजकडून व रुपये १५००० नगरसेविका मेघा गांगण यांजकडून देण्यात आले.
सामन्यांच्या दोन्ही दिवशी क्रीडा रसिकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.





