भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या स्मृती चिरंतन ठेवू – मंगेश मसके

बलिदान दिनानिमित्त पिंगुळीत पदयात्रा

देशासाठी बलिदान देणारे देशभक्त सुखदेव, राजगुरू, भगतसिंग यांच्यामुळेच आपण आज सन्मानाने अभिमानाने जीवन जगत आहोत. त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवल्या पाहिजेत असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष मंगेश मसके यांनी आज बलिदान दिन कार्यक्रमात केले.
   भारत देशासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्त राजगुरू भगतसिंग सुखदेव यांचा 23 मार्च हा बलिदान दिन साजरा केला जातो.  भारत सरकारच्या वतीने व मेरा युवा भारत सिंधुदुर्गच्या वतीने हा बलिदान दिन कार्यक्रम पिंगुळी म्हापसेकर तिठा येथे पदयात्रा काढून साजरा करण्यात आला. ही पदयात्रा पिंगुळी म्हापसेकर तिठा ते बॅरिस्टर नाथ पै प्रशिक्षण संस्था इथपर्यंत काढण्यात आली. पदयात्रेची सुरुवात सरपंच अजय आकेरकर यांनी झेंडा दाखवून केली. बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था आणि श्री गणेश क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ पिंगुळी गुढीपूर यांच्या सहकार्याने बलिदान  पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विकास कुडाळकर, श्री गणेश क्रीडा सांस्कृतिक युवक मंडळाचे अध्यक्ष रणजीत रणसिंग, बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे प्राध्यापिका भाग्यश्री भोगटे, पोलीस पाटील शंकर सातार्डेकर, गोविंद पालवे, कृष्णा ठाकूर, रणवीर रणसिंग, उन्मेष यादव यांच्यासह बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
यावेळी बोलताना  मंगेश मसके म्हणाले, आपला भारत देश स्वतंत्र होण्यासाठी अनेक देशभक्तांनी देशासाठी बलिदान दिले या अनेक देशभक्तामध्ये ज्यांनी तरुणपणातच आपल्या देशासाठी बलिदान दिले. यामध्ये देशभक्त राजगुरू सुखदेव व भगतसिंग यांचा बलिदानाचा दिवस 23 मार्च साजरा केला जातो. या निमित्ताने मेरा युवा भारतच्या वतीने ही पदयात्रा काढण्यात आली. या देशभक्तांच्या स्मृती नेहमी जागृत ठेवल्या पाहिजेत. त्यांच्यामुळेच आपण आज आनंदाने जीवन जगत आहोत असे सांगितले. सरपंच आकेरकर यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले.

error: Content is protected !!