जानवली येथे सुगंधी औषधी वनस्पती लागवड कार्यशाळा

कोकण कोणार्क अॅग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने आयोजन
कोकण कोणार्क अॅग्रो इंडस्ट्रीज एलएलपी यांच्यावतीने कणकवली-जानवली येथील हॉटेल निलम कन्ट्रीसाईड येथे सुगंधी व औषधी वनस्पती लागवड यासाठी दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. 11 व 12 एप्रिल रोजी स.9.30 ते सायं. 5 वा. या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.
कोकणात वाळा (वेटीवर/खस), पचौली, सिट्रोनेला, पाल्मारोजा, गवती चहा (लेमन ग्रास), स्टिविया, तुळस यांची यशस्वीपणे लागवड करता येते व त्यापासून होणार्या उत्पन्न निर्मितीची संधी या विषयावर डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेसाठी मर्यादित 50 जागा असून माफक फी ठेवण्यात आली आहे.ही कार्यशाळा कणकवली-जानवली येथील हॉटेल नीलम कंट्रीसाईड येथे होणार आहे. प्रवेश फी 2000 रु. असून चहा, नाश्ता, जेवण इत्यादी दिले जाणार आहे. जे नागरिक या कार्यशाळेत सहभागी होवू इच्छितात त्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, कोकणातील अधिकाधिक पडिक जमीन लागवडीखाली यावी, त्यातून शेतकर्यांना आर्थिक उन्नती मिळावी यासाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असून त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बी.डी. सावंत (9820214358), नंदू सावंत (9822583566), सुनील सावंत, कमलाकर सावंत, संगीता तिरोडकर यांनी केले आहे.
कणकवली प्रतिनिधी





