वेताळ बांबर्डे येथून युवक बेपत्ता

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आबाजी वासुदेव कदम (23 ) हा युवक 15 डिसेंबर पासून बेपत्ता झालेला आहे. याबाबत त्याचे वडील वासुदेव आबाजी कदम यांनी कुडाळ पोलीस स्थानकात खबर दिली आहे.
15 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता आबाजी हा आपल्या घरातून वडील ज्या ठिकाणी शेतात काम करत होते, त्या ठिकाणी पेजेची किटली घेऊन निघाला होता. मात्र सकाळचे साडेअकरा वाजले तरी तो शेतात न आल्याने त्यांनी घरी फोन करून चौकशी केली असता तो साडेनऊ वाजता पेजेची किटली घेऊन शेतात गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी नातंलगाकडे याबाबत सर्वत्र चौकशी केली. मात्र तो सापडून आला नाही .त्यामुळे आज पोलीस खबर दिली आहे.





