तिर्लोट ठाकूरवाडीतील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

नामदार नितेश राणे यांचा ठाकरे सिनेमा जोरदार धक्का

देवगड : तिर्लोट ठाकूरवाडी येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी बंदर विकास, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश ठाकरे सेनेला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला मोठा राजकीय दणका मानला जात आहे.

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये शादाब मनचेकर (वाडी अध्यक्ष, सदर), रज्जाक भाटकर (वाडी उपाध्यक्ष), सलीम भाटकर, फारूक भाटकर, निसार वाडकर, अ. गनी मुल्ला, इरफान पावसकर, अनिस वाडकर, अ. हमीद भाटकर, नाहीद भाटकर, मुखबार भाटकर, अमीर भाटकर, रहीम भाटकर, शहबाज भाटकर, कादिर मनचेकर, जावेद सोलकर, हैसिर वाडकर, इरफान मनचेकर, फारूक फणसकर, मुसा भाटकर, फहीम मनचेकर, इम्तियाज भाटकर, उमर भाटकर, अदम मनचेकर, फरीद भाटकर, साद मनचेकर, यूसुफ सोलकर, मोहसीन भाटकर, युसुफ मिय्या भाटकर, बशीर मनचेकर, निसार भाटकर, जुबेर सोलकर, अ. रजाक भाटकर, शफी फणसकर, दाऊद फणसनगर, नासी फणसनगर आणि नजीर भाटकर यांचा समावेश आहे.

या प्रवेशामुळे तिर्लोट परिसरात भाजपची संघटनात्मक ताकद निर्विवाद वाढली आहे.
यावेळी देवगड तालुक्यातील यावेळी बाळ खडपे ( देवगड ), संजय बोंबडी अनिल पुरळकर, प्रवीण सावंत, काशीद मनचेकर, मनोज घाडी हे भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

error: Content is protected !!