युवा सेनेची जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा केंद्राची मागणी

मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
सिंधुदुर्ग जिल्हा पहिला AI जिल्हा ठरला. मात्र येथील युवा वर्गाला परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्र जिल्ह्यात नसल्याने परजिल्ह्यात जावे लागते त्याला लागणार खर्चाचा भुर्दंड येथील युवकांना पडतोय. सर्व शासकीय परीक्षा, स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात व्हावे यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशी मागणी युवासेनेच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्राबाबत जिल्हाधीकारी तुरपती धोडमिसे यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे, जिल्ह्यात भोसले पोलिटेक्निक, MITM सारखी IT ची कॉलेज असताना, अश्या प्रकारची सुविधा उपलब्ध असताना परीक्षा केंद्र जिल्ह्यात मिळत नाही याची कमालच वाटते. सध्या सिंधुदुर्ग जिल्हातील धर्मादाय आयुक्त कार्यालयातील जागेच्या परीक्षा लागल्या आहेत. यात पहिल्या पसंतीचे केंद्र मध्ये सिंधुदुर्ग हा पर्याय असला तरी त्याठिकाणी न देता परजिल्हातील केंद्र परीक्षेसाठी दिली जातात.
जिल्ह्यातील राज्यकर्त्यांकडून काहीही अपेक्षा नाही, ते फक्त निवडणुका लागल्यावर दिसतात. याआधीदेखील युवासेनेच्या माध्यमातून आम्ही आवाज उठवलेला. युवासेना कायम युवकांच्या पाठीशी उभी आहे. त्यामुळे सर्व शासकीय परीक्षा, स्पर्धा परीक्षा केंद्र जिल्ह्यात व्हावे यासाठी आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत अशी जिल्हाधिकारी यांना विनंती करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, युवासेना कुडाळ शहर प्रमुख संदिप म्हाडेश्वर, युवासेना कुडाळ शहर समन्वयक अमित राणे, मंदार कोठावळे उपस्थितीत होते.





