भजनसम्राट बुवा.एकनाथ गांवकर(शिवडाव)यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा.

कै.परशुराम पांचाळ बुवा यांचा लाभला होता दीर्घ सहवास.

कणकवली/मयूर ठाकूर :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये भजन क्षेत्रातील एक तेजस्वी तारा,भजन रत्न,भजन सम्राट बुवा एकनाथ गावकर यांचे अकाली निधन झाले.त्यांच्या जाण्याने संपूर्ण कोकणातील भजनी परंपरेवर शोककळा पसरली आहे.एकनाथ गावकर बुवा हे भजन क्षेत्रातील एक हरहुन्नरी रत्न होते.रागधारी भजन,पारंपरिक कीर्तन,तसेच अध्यात्मिक चिंतन यांचा त्यांनी अत्यंत बारकाईने अभ्यास केला होता.कोकणातील सुप्रसिद्ध भजनी बुवा कै.परशुराम पांचाळ बुवा यांचे ते पटशिष्य होते.अनेकदा पांचाळ बुवा स्वतः शिवडाव गावी जाऊन त्यांच्या सहवासात राहिले असल्याचे जुन्या जाणत्यांच्या तोंडून ऐकायला मिळते.भजन परंपरेत त्यांनी असंख्य शिष्य घडवले.जुन्या काळातील श्रेष्ठ आणि ज्येष्ठ भजनी बुवांपैकी एक अशी त्यांची ओळख होती.भजनामध्ये भाव,रागधारी आणि भक्तीचा अद्भुत संगम त्यांनी साकारला होता.त्यांचा स्वभाव अत्यंत नम्र,विनम्र आणि मोकळा होता.प्रत्येकासोबत प्रेमाने,आदराने वागणे हीच त्यांची ओळख होती.त्यांच्या निधनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच कोकणातील सर्वच भजनप्रेमी,शिष्यवर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.भजनी क्षेत्राला दिशा दाखवणारा आणि भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवणारा हा तेजस्वी दीप आज मावळला…! “एकनाथ गावकर बुवा यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली!”

-बुवा मयूर ठाकूर(शिवडाव)

error: Content is protected !!