फातिमाबी मेमोरियलच्या विविध स्पर्धा संपन्न

झाराप मदरसा आणि गोंधयाळे मदरसा यांचे वर्चस्व

शहरातील फातिमाबी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व, गायन आणि प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये नऊ शाळांमधून झाराप मदरसा आणि गोंधयाळे मदरसा यांनी वर्चस्व राखत उज्जवल यश मिळविले.
   कुडाळ शहरातील फातिमाबी मेमोरियल ट्रस्ट आणि फातिमाबी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक उर्दू सेमी इंग्लिश स्कूल मस्जिद मोहल्ला येथे मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेली १७ वर्षे गायन, वादन आणि प्रश्नमंजुषा आदी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. याही वर्षी या स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे उद्घाटन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुशे यांच्या हस्ते, उद्योजक तथा सिंधुदुर्ग जिल्हा मुस्लिम समाज उत्कर्ष समिती अध्यक्ष मुश्ताक शेख,  नगरसेवक अँड राजीव कुडाळकर, अब्दुल रहमान अहमद शेख, नगरसेविका आफ्रिन करोल,फातिमाबी मेमोरियल ट्रस्टचे हमीद शेख, समद शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी मौलाना अफजल मौलाना मुकीब, मुख्याध्यापिका सारा जमीर अहमद शेख, रहेमतबी जमील शेख, अनीसा शौकत शेख, आफरिन नासिर शेख,  विद्यार्थी शिक्षक पालक आदी उपस्थित होते.
श्रीमती काळुशे यांनी या जिल्हा परिषद उर्दू सेमी इंग्लिश स्कूलला शालेय पातळीवर जी मदत करता येईल यासाठी निश्चितच प्रयत्न केला जाईल. फातिमाबी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक गरजा पूर्ण केल्या जातात हे निश्चितच ट्रस्टचे कार्य कौतुकास्पद आहे असे सांगितले. उद्योजक मुश्ताक शेख म्हणाले, स्पर्धात्मक युगात वाटचाल करताना शिक्षणाबरोबरच कला क्षेत्र महत्वाचा भाग आहे. आज कलाक्षेत्रात सिंधुदुर्गात अशा प्लॅटफॉर्मवरून विविध कलाकार घडत आहेत आणि अशा स्पर्धेच्या माध्यमातूनच शिक्षणाचे धडे घेतानाच विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे जाण्याची दिशा ही फातिमाबी मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून गेली १७ वर्षे सुरू आहे, हे निश्चितच कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांना या कलागुणातून प्रेरणा देणारे असल्याचे सांगितले. सर्वांचे आभार  ट्रस्टचे हमीद शेख व समद शेख यांनी मानले.

विविध स्पर्धा निकाल

वक्तृत्व स्पर्धा लहान गट – प्रथम आचरे उर्दू हायस्कूल, द्वितीय झाराप मदरसा दाउल अलुम  फैजाने जारी मियाम, तृतीय गोंधयाळे उर्दू स्कूल जिल्हा परिषद,
मोठा गट – प्रथम मदरसा झाराप, द्वितीय गोंधयाळे मदरसा, तृतीय ईबीटी हायस्कूल विजयदुर्ग ठाकूरवाडी, गायन  – लहान गट – प्रथम झाराप मदरसा, द्वितीय ईबिटी हायस्कूल ठाकूरवाडी विजयदुर्ग, तृतीय गोंधयाळे मदरसा, मोठा गट- प्रथम मदरसा गोंधयाळे, द्वितीय सेंट्रल उर्दू हायस्कूल सावंतवाडी, तृतीय झाराप मदरसा, प्रश्नमंजुषा – लहान गट – प्रथम गोंधयाळे  मदरसा, द्वितीय मज्जिद मोहल्ला सेमी इंग्लिश उर्दू शाळा, तृतीय झाराप मदरसा, मोठा गट – प्रथम हरकुळ बुद्रुक उर्दू हायस्कूल, द्वितीय  कोकण उर्दू हायस्कूल विजयदुर्ग, तृतीय ईबीटी ठाकूरवाडी विजयदुर्ग, परीक्षक म्हणून मौलाना अफजल, मौलाना मुकीब यांनी काम पाहिले.

error: Content is protected !!