राधारंग फाउंडेशनतर्फे जिव्हाळा आश्रमात फराळ वाटप

राधारंग फाऊंडेशन या संस्थेने दिपावली निमित्त रविवारी जिव्हाळा सेवाश्रमास भेट दिली. यावेळी राधारंग फाउंडेशन सदस्यांनी लाभार्थीना जिवनावश्यक वस्तूंचे तसेच फराळाचे वाटप केले.
आश्रमाप्रती आपल्या भावना, व्यक्त करताना सदस्यांचे मन भरून आले. विशेषत: जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री बिर्जे यांनी चालविलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाचे त्यांनी मनापासून कौतूक केले. तसेच गोशाळे बाबत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या प्रसंगी राधारंग फाऊंडेशनच्या सौ. अरुणा रमाकांत सामंत, सौ. स्वाती रविंद्र वाजवलकर , प्रथमेश बळीराम नाईक, सौ. पूर्वा प्रथमेश नाईक, अमेय अभयकुमार देसाई , सचिन सामंत, संतोष सामंत तसेच जिव्हाळाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे, जयप्रकाश प्रभु ,कु.गितांजली बिर्जे, सौ. प्राजक्ता केळूसकर इत्यादी उपस्थित होते. संस्थाध्यक्षानी राधारंग फाऊंडेशनच्या ह्या सामाजिक उपक्रमाचे कौतूक करून त्यांचे आभार मानल.





