आणि जेष्ठ नागरीकांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

आचरा पोलीसांनी साजरी केली जेष्ठ नागरिकांसोबत दिपावली

एकटेपणाने वास्तव्यास असलेल्या जेष्ठांचा एकटे पणा दूर व्हावा त्यांना काही क्षण आनंदात व्यथित करता यावेत, सुरक्षेबाबत त्यांना सजग बनवावे या हेतूने आचरा पोलीस स्टेशन तर्फे पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी जेष्ठ नागरिकांसोबत दिपावली साजरी करत भेटवस्तू ही दिल्या.
सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक नयोनी साटम यांच्या संकल्पनेतून या वर्षाची दिवाळी ही जेष्ठ नागरिकां सोबत साजरी व्हावी या उद्देशाने तसेच वाढत्या जेष्ठ नागरिक फसवणूक घटना
समाजात घडत असलेल्या सायबर क्राईम, सायबर बँकिंग फसवणूक, विविध जाहिराती द्वारे होणाऱ्या फसवणुकी बाबत सिंधुदुर्ग पोलीस दल आणि आचरा पोलीस स्टेशन कम्युनिटी पोलिसिंग अंतर्गत “सिंधुदुर्ग पोलीस-संवादातून आधार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर चे संचालक भिकाजी कदम,जेष्ठ नागरिक श्रीम जानकी औदुंबर तावडे देऊळवाडी श्रीम राजश्री राजाराम परब – डोंगरेवाडी श्रीम सावित्री नारायण घाडी – देऊळवाडी श्रीम गुलाब कानू सकृ मंदाकिनी रामचंद्र टिकम निता प्रकाश पांगे सहदेव हिर्लेकर यांसह अन्य जेष्ठ नागरिक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिनाक्षी देसाई, तुकाराम पडवळ, पोलीस पाटील विठ्ठल धुरी, जगन्नाथ जोशी, सौ. तन्वी जोशी, अमोल पेडणेकर यांसह अन्य पोलीस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी आजच्या सोशल मिडयाच्या युगात मोठ्या प्रमाणात सायबर क्राईम तसेच ऑनलाईन बँकिंग फसवणूक सारखे गुन्हे वाढले आहेत. बहुतांशी जेष्ठ नागरीकांची मोठ्या प्रमाणात सायबर बँकिंग फसवणूक होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे सोशल मीडिया फ्रॉड मध्ये जेष्ठ नागरिकांनी फसू नये, फ्रॉड कॉल, सोशल फ्रॉड जाहिरात यांच्या फसवणुकी पासून सावधान राहावे. जेष्ठ नागरिक हेल्पलाईन क्रमांक ७०३६६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधून आपल्या समस्या मांडव्यात. जेष्ठ नागरिकांच्या सेवे साठी पोलीस सदैव तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी जेष्ठ नागरीक संघ आचरा तर्फे पोलीसांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

error: Content is protected !!