नवतरुण मित्रमंडळ आचरा नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्री वाडी प्रथम

नवतरुण मित्रमंडळ आचरा तर्फे आयोजित नरकासुर स्पर्धेत विश्वकर्मा मेस्त्रीवाडी संघाने प्रथम क्रमांक मिळविला. तर द्वितीय क्रमांक घाडी वाडी मित्रमंडळ, तृतीय क्रमांक डोंगरेवाडी संघांने मिळविला. स्पर्धेचे बक्षिस वितरण उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा गावचे उपसरपंच संतोष मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी
जयप्रकाश परुळेकर, चंदू कदम, महेंद्र घाडी, पंकज आचरेकर यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते. या स्पर्धेत चतुर्थ क्रमांक घाडीवाडी संघाने तर पाचवा मिराशिवाडी संघांला प्राप्त झाला. या स्पर्धेसाठी सर्व पारितोषिक शिवसेना शिंदे गट आचरा यांच्यातर्फे देण्यात आली. तसेच सर्व चषक ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर यांच्याकडून देण्यात आली. स्पर्धा यशस्वीतेसाठी योगेश बागवे, दीपक आचरेकर, रुपेश हडकर, वाळू संघटना, तसेच सर्व मित्र मंडळी यांनी विशेष मेहनत घेतली.





