कुडाळ शहर शिवसेना सचिवपदी विलास वराडकर

कुडाळ शहर शिवसेनेच्या सचिवपदी कविलकाटे माजी ग्रामपंचायत सदस्य विलास वराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते कविलकाटे येथे नियुक्तीपत्र देण्यात आले.
कविलकाटे येथे शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये कविलकाटे येथे असणाऱ्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. या समस्या आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून लवकरच सोडविल्या जातील असे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सांगितले. त्याचप्रमाणे नगरपंचायतीमध्ये या प्रभागातून नगरसेवक निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असे त्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीमध्ये कुडाळ शहर शिवसेना सचिवपदी विलास वराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आणि त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, शहर प्रमुख अभिषेक गावडे, गटनेता विलास कुडाळकर, नगरसेवक राजीव कुडाळकर, सरचिटणीस राकेश कांदे, युवा शहर प्रमुख आबा धडाम, चेतन पडते, कविकाटे शाखाप्रमुख जळवी, युवा शाखाप्रमुख गडेकर तसेच कविलकाटे मधील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





