माजी आमदार वैभव नाईक यांना धक्का

ग्रामपंचायत सदस्य आणि ठाकरे सेना आचरा महिला विभाग प्रमुख अनुष्का गावकर भाजप मध्ये

माजी आमदार वैभव नाईक यांना भाजपने आचरा विभागात चांगलाच धक्का दिला आहे. वैभव नाईक यांची विश्वासू सहकारी आचरा महिला विभाग प्रमुख आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. अनुष्का गावकर आणि प्रशांत गांवकर यांनी सोमवारी भाजप तालुकाधृयक्ष धोंडू चिंदरकर यांच्या निवासस्थानी भाजपा मधे पक्ष प्रवेश भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते घेण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब,बाबा मोंडकर, मिताली कोरगावकर महेश मांजरेकर, संतोष गावकर, चिंदर माजी उपसरपंच दीपक सुर्वे, विजय निकम, सुमित सावंत, सतीश वाईरकर, बंडू गावडे, देवेंद्र हडकर, जीवन भोगावकर, सुशील गावडे, संतोष गावकर, संजय लोके, हे उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीने प्रेरीत होऊन भाजप मध्ये प्रवेश केला असल्याचे गांवकर यांनी सांगितले. यापुढे पक्ष वाढीसाठीआपण ताकतीने भा ज पा साठी काम करणार असल्याचे सांगितले.

error: Content is protected !!