मालवण महसूल सेवक संघटना नागपूर येथील आंदोलनात सहभागी

महाराष्ट राज्य महसूल सेवक संघटना यांच्याबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हा महसूल सेवक संघटना आणि मालवण तालुका महसूल सेवक संघटना यांनी राज्यव्यापी कामबंद आंदोलन दिनांक 12 सप्टेंबर 2025 पासून सुरु केले आहे.
यात मालवण तालुका महसूल सेवक संघटना अध्यक्ष समीर गुरव आपल्या तालुक्यातील 35 महसूल सेवक यांच्यासह या संपात.संविधान चौकात नागपूर येथे सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
या राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची दखल शासनाने घेण्यासाठी 4 ऑक्टोबर पासून विदर्भ संघटनेचे रविंद्र बोदिले व योगेश शेडमाके या महसूल सेवकांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. यांच्या सोबत त्यांना साथ देत हे आंदोलन अधिकच तीव्र करण्यासाठी राज्यातील सुमारे 5 हजार महसूल सेवक हे संविधान चौक नागपूर येथे सध्या तळ ठोकून बसलेले आहेत.
महाराष्ट् राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अन्नत्याग आंदोलन स्थळी भेट देऊन चर्चा करत, राज्य विधानसभेत आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत मी आवाज उठवून, राज्यातील महसूल सेवक संवर्गास चतुर्थ श्रेणी मंजूर करून देण्यासाठी खंबीरपणे सोबत राहीन अशी ग्वाही देत पाठिंबा दिला असल्याची माहिती गुरव यांनी दिली.
महाराष्ट तलाठी संघ आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघानेही या महसूल सेवक संघटना यांनी पुकारलेल्या बेमुदत कामबंद आणि अन्नत्याग आंदोलन यास पाठिंबा दिला आहे.

error: Content is protected !!