खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांची तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत यश

प्रशालेच्या वतीने विद्यार्थ्यांचा करण्यात आला विशेष सत्कार व अभिनंदन
कणकवली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत खारेपाटण येथील कै.प्र.ल.पाटील आर्टस कॉमर्स अँड सायन्स ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले असून विद्यार्थ्यांच्या या यशस्वी घोडदौड ची खारेपाटण शिक्षण संस्था व शाळेने दखल घेत नुकताच या सर्व विद्यार्थ्यांचा खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष सत्कार करत सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
कणकवली तालुकास्तरीय खो खो स्पर्धा नुकतीच वामनराव महाडिक हायस्कूल,तळेरे येथे पार पडली होती.यामध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या खो खो स्पर्धेमध्ये खारेपाटण हायस्कूल च्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला यामध्ये आदित्य भालेकर,श्रवण कोलते, संस्कार तावडे,हर्ष तावडे,देवानंद राऊत,जय सुतार,चिन्मय गुरव, सार्थक शिंदे,साईराज जाधव,विराज तेली,मानव कांबळे,देवाशिष कुलकर्णी,आर्यन कोवळे,आयुष मण्यार,आयुष गुरव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तर १९ वर्षाखालील मुलींच्या खो-खो स्पर्धेमध्ये खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.यामध्ये कुमारी आदिती आंग्रे,सृष्टी पाष्टे, समीक्षा पेंडकलकर,समीक्षा गुरव, संचिता उगवे,भक्ती पाष्टे,भक्ती भोवड,दिव्या राबाडे,दीक्षा राबाडे, केतकी जाधव,ऋतुजा कदम,अनु प्रभू,सेजल धुमक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
तसेच १९ वर्षाखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेमध्ये खारेपाटण ज्युनिअर कॉलेजच्या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.यामध्ये देवेंद्र कदम,सुजल भालेकर,समीर नावळे,शार्दुल धावडे, लव वाडेकर,प्रजल येतकर,अथर्व धुमक,अनुराज भोवड,आदित्य भोवड,आयुष जाधव,कुश वाडेकर, केतन पाटणकर,जयेंद्र राठोड, तन्मय भरडे,सोहम कासार्डेकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री.कीरसिंग पाडवी व श्री. रामदास भिसे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.तर सर्व विद्यार्थ्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे, उपाध्यक्ष श्री भाऊ राणे, सचिव श्री महेश कोळसुलकर, संस्थेचे सर्व विश्वस्त खारेपाटण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सर्व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन केले आहे.





