जागतिक पर्यटन दिनाचे औचित्याने 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण

जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधत 27 सप्टेंबर रोजी ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेच्या वेबसाईटचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ऑनलाइन अनावरण करण्यात आले. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पर्यटनातून रोजगार निर्मिती या संकल्पनेतून ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांनी सदर वेबसाईटची निर्मिती केली असून त्याचा फायदा गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिर्मिती होण्यामध्ये होणार आहे. याप्रसंगी नितेश राणे यांनी ग्रामपंचायतीचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध युट्युबर रानमाणूस म्हणजेच प्रसाद गावडे यांनीही ऑनलाईन उपस्थित राहत गावातील साधन संपत्ती जपून पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करण्याच्या ग्रामपंचायतच्या उद्देशाने कौतुक केले. तसेच प्रत्यक्षदर्शी गावात येऊन या उपक्रमाला प्रमोट करू असे आश्वासनही दिले. गावात पर्यटन वाढीसाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करूया, असे आवाहनही प्रसाद गावडे यांनी केले.

या कार्यक्रमाला तहसीलदार सूर्यकांत पाटील, पंचायत समिती गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी उपस्थित राहून प्रत्यक्ष अनावरण केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यावेळी तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी प्रशासनाकडून लागणारे सहकार्य गावाला आम्ही देऊ असे आश्वासन दिले. तर गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पहिलेच वेबसाईट आपल्या ग्रामपंचायतीने लॉन्च करून तालुक्यासहित जिल्ह्याला आदर्शवत असं काम केल्याबद्दल ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी संपूर्ण वेबसाईटची माहिती वेबसाईट क्रिएटर्स श्री. काझी यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी वैभववाडी तहसीलदार सूर्यकांत पाटील, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, कृषी विस्तार अधिकारी प्रकाश आडुळकर, गावचे सरपंच दीपक चव्हाण, उपसरपंच नवलराज काळे, माजी सरपंच विजय रावराणे, ग्रामपमचायत अधिकारी प्रशांत जाधव, वेबसाईट क्रियेटर्स श्री. काजी, शिराळे भाजपा बूथ अध्यक्ष विजय पाटील, सडूरे भाजपा बूथ अध्यक्ष प्रकाश रावराणे, ग्रामपंचायत सदस्य विलास जंगम, विशाखा काळे रोशनी बाणे, आरुळे सरपंच सौ. रावराणे, उपसरपंच रमेश वारंग तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, शिराळे पोलीस पाटील महेंद्र शेळके, अरुळे पोलीस पाटील सूर्यकांत बोडके, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष दत्ताराम रावराणे, सोसायटी व्हाय. चेअरमन विजय रावराणे व इतर मान्यवर तसेच सडूरे शिराळे पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच नवलराज काळे यांनी, पर्यटन दिनाच्या निमित्ताने ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेची संपूर्ण माहिती जागतिक पातळीवरती प्रसिद्ध झाली आहे. यामुळे गावातील पर्यटनाला चालना मिळून पर्यटनातून रोजगार निर्मिती करण्याचा माझा मानस पूर्ण होतोय, अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत जाधव यांनी केले प्रस्तावना व आभार प्रदर्शन उपसरपंच नवलराज काळे यांनी केले.

error: Content is protected !!