युवा महोत्सवात एसआरएम कॉलेजच्या श्रुतिका मोर्येला सुवर्णपदक

श्रुती सावंतला गायनात कांस्यपदक
मुंबई विद्यापीठ आयोजित युवा महोत्सवाच्या विद्यापीठ फेरीत संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
द्वितीय वर्ष कला वर्गातील कु. श्रुतिका मोर्ये हिने तालवाद्य या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून तिला सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले.
तर प्रथम वर्ष कला वर्गातील कु. श्रुती सावंत हिने शास्त्रीय संगीत या प्रकारात तिसरा क्रमांक मिळवून कांस्य पदक पटकावले. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल सांस्कृतिक विभाग व महाविद्यालयातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या, सांस्कृतिक विभाग आणि महाविद्यालयातर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.
या दोन्ही विद्यार्थिनींच्या यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून त्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.





