शिक्षक दिनानिमित्त जनजागृती सेवा संस्था, ठाणे मार्फत खारेपाटण ज्युनिअर कॉलेजमधील प्राध्यापकांचा सत्कार समारंभ संपन्न

जनजागृती सेवा संस्था (रजि), ठाणे या सामाजिक संस्थेच्यावतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त उद्योगश्री. प्र. ल. पाटील ज्युनियर कॉलेज, खारेपाटण, तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग येथील प्राध्यापकांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी जनजागृती सेवा संस्था, ठाणे चे संस्थापक अध्यक्ष श्री. गुरुनाथ तिरपणकर, खजिनदार मा. श्री. दत्ता कडूलकर, सेवानिवृत्त शिक्षक श्री. भास्कर गुरसाळे, कलादिग्दर्शक आणि गायक श्री. शशिकांत कांबळी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री गुरुनाथ तिरपणकर यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून व्यक्त केला. 2021 स्थापन झालेल्या या संस्थेच्या माध्यमातून विविध शैक्षणिक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. विविध सेवाभावी संस्थांना आर्थिक मदतीचा हात नेहमीच या संस्थेच्या माध्यमातून दिला जातो. कोरोना काळात गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात जनजागृती सेवा मंडळ मार्फत देण्यात आला. संस्थेच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
या सत्कार समारंभामध्ये ज्युनिअर कॉलेज खारेपाटण चे प्राचार्य श्री संजय सानप, पर्यवेक्षक श्री संतोष राऊत, सहाय्यक शिक्षक श्री अजय गुरसाळे, श्री दयानंद कोकाटे, श्री अंकुश नाईक, श्री संगाप्पा गुरव, श्री सुरेश करांडे, श्री रामचंद्र लोके, श्री नितीन वरुणकर, श्री भोलेनाथ कानागल, श्री सुबोध देसाई, श्री दिगंबर गुरखे, श्रीमती दीक्षा गुरखे, श्रीमती सारिका महिंद्रे, श्रीमती तबसूम काझी, श्रीमती दर्शना पाताडे, कु. गौरी सारंगे कु. श्रुतिका जांभेकर कु. सायली पालव आणि सेट परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन केल्याबद्दल श्री. ऋषिकेश सानप यांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रवीण लोकरे उपाध्यक्ष श्री. भाऊ राणे सचिव श्री. महेश कोळसुलकर, संचालक श्री. विजय देसाई सिनिअर कॉलेज प्राचार्य श्री. कांबळे सर प्रशालेचे प्राचार्य श्री. संजय सानप पर्यवेक्षक श्री. संतोष राऊत सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. जनजागृती सेवा संस्थेच्या अभिनव उपक्रमाबद्दल खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांनी आभार व्यक्त केले.




