निलेश राणे मंत्री होऊ दे रे म्हाराजा !

आमदार निलेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन

राणे कटुंबियांवर गणपती बाप्पाचा नेहमीच वरदहस्त !

आम. निलेश राणे यांनी व्यक्त केली बाप्पाप्रती कृतज्ञता

कुडाळ : निलेश राणे हे सिंधुदुर्ग राजाच्या कृपाशीर्वादाने आमदार झाले तसे ते राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री होऊ दे अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे, हे गणराया ती इच्छा तू पूर्ण कर असे साकडे आज सिंधुदुर्ग राजा चरणी घालण्यात आले. कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी आज दुपारी कुडाळ इथं सिंधुदुर्ग राजाचं दर्शन घेतलं. त्यावेळी पुरोहितांनी सिंधुदुर्ग राजा चरणी गाऱ्हाणं घातल्यावर सर्वानीच त्याला होय म्हाराजा म्हणून साथ देत गणपती बाप्पा आणि आमदार निलेश राणे यांचा जयघोष केला.
कुडाळ इथं महायुतीच्या कार्यलयाच्या पटांगणात सिंधुदुग राजाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग राजा गणेशोत्सवाचं यंदाचं १६ वर्ष आहे. यावर्षी सिंधुदुर्ग राजा २१ दिवसांचा असणार आहे. आमदार निलेश राणे हे विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून यावेत असा नवस गेल्यावर्षी सिंधुदुर्ग राजाच्या चरणी भक्तांनी केला होता. भक्तांच्या हाकेला सिंधुदुर्ग राजा पावला आणि निलेश राणे कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार झाले. त्यांचा हा नवस सिंधुदुर्ग राजाच्या प्राणप्रतिष्ठापाने दिवशी सोन्याचे पाऊल अर्पण करून फेडण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर आज दुपारी आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग राजाचं दर्शन घेतलं. ढोल ताशांच्या गजरात आमदार निलेश राणे यांचं सिंधुदुर्ग राजा मंडप स्थळी आगमन झालं. त्यांनी सिंधुदुर्ग राजाची पूजा केली. त्यांनतर गणपती बाप्पाची आरती करण्यात आली. त्यांनतर पुरोहितानी बाप्पा चरणी गाऱ्हाणं घातलं. आमदार निलेश राणे यांच्यासह राणे कुटुंबियांना उत्तम आरोग्य, ऐश्वर्य द्या, त्आगामी सर्व निवडणुकात त्यांना यश देऊन जनतेची सेवा करण्याची संधी द्या आणि निलेश राणे यांना लवकरच मंत्री करा असं साकडं बाप्पा चरणी घालण्यात आलं.
त्यानंतर निलेश राणे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. राणे कुटुंबियांवर गणपती बाप्पाचा नेहमीच कृपाशिर्वाद राहिला आहे. गेल्या वर्षी मी आमदार व्हावं यासाठी कार्यकर्त्यांनी नवस केला होता. त्यामुळे सोन्याचं पाऊल अर्पण करून तो नवस फेडल्याच आमदार राणे म्हणाले. मंत्रिपदाबाबत विचारलं असता, ते म्हणाले, कार्यकर्त्यांची तशी इच्छा असली तरी ते माझ्या हातात नाही, असे ते म्हणाले.
यावेळी शिवसेना दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, विनायक राणे, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, विलास कुडाळकर, अभि गावडे, सुनील बांदेकर, ओंकार तेली, नयना मांजरेकर, श्रुती वर्दम, दीपक नारकर, तसंच नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!