स्वयंभु लिंगेश्वर प्रतिष्ठान महाळुंगे यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन समारंभ संपन्न

देवगड – महाळुंगे येथील स्वयंभु लिंगेश्वर प्रतिष्ठान यांच्या वतीने १० वी १२ वी उत्तीर्ण विदयार्थी व पालक यांच्या करीता विजयी भव हा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सर्व उत्तीर्ण विध्यार्थी यांना शालेय भेटवस्तू व १० वी १२ वी नंतर नक्की काय करावे या क्षेत्रात असेल्या संधी याबाबत शिक्षण तज्ज्ञ रामकृष्ण राणे यांनी मार्गदर्शन केले, ते म्हणाले शाळेबद्दल ऋण व्यक्त करा कृतज्ञता महत्वाची असते, ध्येय घेऊन जगले पाहिजे त्यासाठी अविरत प्रयत्न करा, पुस्तके वाचा संधी, मिळेल तिथे आपले मत व्यक्त करा, जिद्ध चिकाटीने ध्येय गाठण्यास सज्ज राहा, आई वडील व गुरुजन यांचे मार्गदर्शन घेऊन पुढे जा, अभ्यासक्रमांची निवड करताना आपल्यला कोणते क्षेत्र आवडते ते साद्य करून यशस्वी वाटचाल करा
या सत्कार समारंभाला ग्रामसेवक शिवराज राठोड, सरपंच संदीप देवळेकर, उपसरपंच भक्ती घाडीगावकर, पोलिसापाटील आत्माराम तोरसकर, सोसायटी चेरमन सुरेश राणे, संदीप राणे, प्रकाश राणे, सुवर्णा घाडी, सुभाष नवले आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक परब यांनी केले आभार साक्षी तोरसकर यांनी मानले.

error: Content is protected !!