आचरे एस टी वाहतूक नियंत्रक अनाजी गावडे यांचा साने गुरुजी कथामाला शाखा मालवणच्या वतीने सत्कार

” ‘बहुजन हिताय,बहुजन सुखायं ‘हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे ब्रीद आहे.ते ब्रीद अनाजी गावडे(वाहतूक नियंत्रक) यांनी आचरे येथे आठ महिने वाहतूक नियंत्रक म्हणून सेवा करताना अक्षरश: साकार केलेले आहे.” असे उद्गगार सुरेश शामराव ठाकूर-अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांनी अनाजी गावडे यांच्या सेवानिवृत्तीपर सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने काढले. मनमोकळा स्वभाव आणि सेवामयी वृत्ती यामुळे ते प्रवाशांमध्ये लोकप्रिय झाले .साने गुरुजी कथामाला-मालवण दरवर्षी सेवामयी कर्मचाऱ्यांचा सत्कार करते.आज वाहतूक नियंत्रक कक्षआचरे येथे अनाजी गावडे यांच्या सदिच्छा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह, आणि सानेगुरुजींचे श्यामची आई पुस्तक भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सुगंधा गुरव, रामचंद्र कुबल,पांडुरंग कोचरेकर, सुरेंद्र सकपाळ, रमाकांत शेट्ये, संजय परब, सायली परब,कामिनी ढेकणे, नेहा बापट आदी उपस्थित होते.
आपल्या भावना व्यक्त करताना अनाजी गावडे म्हणाले,”माझा हा सेवानिवृत्तीबद्दल जो सत्कार केला, त्याने मी खरंच भारावून गेलो, मला खूप छान वाटलं.आजच्या या सत्कारा बद्दल आपल्या संस्थेचा मी आभारी आहे.पूर्वी सेवेत असताना एका अपघात प्रसंगी चालकांना सहकार्य करुन पन्नास प्रवाशांचा एक वाहक म्हणून जीव वाचवला,त्याबद्दल एस. टी.

महामंडळाने माझा जो सत्कार केला होता.तेवढ्याच तोलामोलाचा हा कथामालेचा सत्कार वाटला.”
यापूर्वी मा.महेंद्र शिंदे(पोलिस निरीक्षक) आचरा,मा .महेश कोळंबकर (बँक ऑफ महाराष्ट्र) आदींचे सत्कार करण्यात आले होते.

error: Content is protected !!