‘तिरंगा रॅली’स नांदगाव तिठा येथे उस्फूर्त प्रतिसाद

देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणला
“भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “जय जवान जय किसान” अशा देशभक्तीपर घोषणा देत नांदगाव तिठा परिसर दणाणून गेला. भारतीय सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज नांदगाव तिठा येथे ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला नागरिक, स्थानिक पदाधिकारी आणि युवकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
भारतीय जवानांचे देशासाठीचे शौर्य, बलिदान आणि समर्पण यांना मानाचा मुजरा देत रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले. देशप्रेम जागवणाऱ्या घोषणा, हातात तिरंगा आणि चेहऱ्यावर अभिमान — अशा वातावरणात ही रॅली पार पडली.
या रॅलीमध्ये माजी सभापती व भाजप तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, खरेदी विक्री संघाचे संचालक व भाजप तालुकासरचिटणीस पंढरी वायंगणकर, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर, कासार्डे उपसरपंच गणेश पातडे, युवक तालुका अध्यक्ष अण्णा खाडये यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
त्याचप्रमाणे हर्षदा वाळके, सुशील इंदप बांदिवडेकर, प्रदीप हरमलकर, रघुनाथ लोके, रज्जाक बटवाले, संतोष परब, कमलेश पाटील, श्री वाडेकर (सरस्वती कॉलेज ऑफ नर्सिंग), प्रा. धनराज सर, पत्रकार उत्तम सावंत, ऋषिकेश मोरजकर, गौरी परब, गवस साठविलकर, श्रीकृष्ण वायंगणकर, भूपेश मोरजकर, हेमंत वांगणकर, राजू परब, वैभव वायंगणकर, प्रथमेश भाट, लखन चव्हाण सर, रोहिणी सावंत, सृष्टी कांजी, स्नेहल सातपुते, ऋषिका चंदवले आदी नागरिक आणि तोंडवली कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रॅलीच्या माध्यमातून देशप्रेमाचे जागरण होत असतानाच, शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळाले. आयोजकांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करत एक स्मरणीय कार्यक्रम घडवून आणला.





