बंदीभागात वाळू उपशा करणाऱ्या होड्या तळाशिल ग्रामस्थांनी पकडल्या

तळाशील ग्रामस्थ आक्रमक; होडी मालकांसह, परप्रांतीय कामगारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
तोंडवळी तळाशील येथील , कालावल खाडीपात्रात बंदी असलेल्या भागात अनधिकृत वाळू उत्खनन करत असलेल्याच्या कारणावरून दोन होड्या ग्रामस्थांनी पकडून महसूल प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. ही रविवारी सायंकाळी कालावलं खाडीपात्रात घडली. दरम्यान वाळू उत्खनन करणाऱ्या होड्या पकडल्याचे कळताच मालवण पोलीस दाखल झाले होते. खाडीपात्रात भर पाण्यात कामगारांसहित होड्या रात्रीच्या वेळी उभ्या करून ठेवणे धोक्याचे असल्याने महसूल खाते कारवाई करेपर्यंत सदर होड्या किनाऱ्यावर हलवण्याच्या सूचना मालवण पोलिसांनी केल्या. यावेळी होड्या खाडीकिनारी आणण्यात आल्या. दरम्यान सोमवारी सायंकाळी तळाशील येथे दाखल झालेल्या आचरा तलाठी यांनी पकडलेल्या होड्यांची पंचायदी घालण्याचे काम हाती घेतले होते पंचायदी घातल्यानंतर फुढील कारवाई होईपर्यंत पोलीस पाटील यांच्या तब्यात देणार असून कारवाईसाठी अहवाल तहसीलदार मालवण यांना सादर केला जाणार असल्याची माहिती आचरा तलाठी मोसमी शिरसाठ यांनी दिली

कालावलं खाडीपात्रात तळाशील किनाऱ्यासमोर वाळू उपसाबंदी असलेल्या भागात रेवंडी येथील दोन होड्या वाळू उपसा करत असल्याचे समजताच तळशील ग्रामस्थांनी होड्यांच्या सहाय्याने जात वाळू उपसा करणाऱ्या दोन होड्या पकडल्या दोन्हीही होड्यावर कोणतेही अधिकृत परवाने नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले यात एक होडी पूर्ण वाळूने भरलेली तर दुसरी होडी अर्धवट भारलेल्या अवस्थेत होती. या दोन्ही होड्यावर मिळून 28 परप्रांतीय कामगार वाळू काढण्याचे काम करत होते. ग्रामस्थांनी होड्या पकडल्याचे कळताच मालवण पोलीस ठाण्याचे सहाय्य्क पोलीस निरीक्षक गणेश माने, सह पोलीस उपनिरीक्षक हेमंत पेडणेकर, पोलीस पाटील जगदीश मुळे हजर झाले होते. सायंकाळी पकडलेल्या वाळूच्या होड्या जास्तवेळ पाण्यात ठेवणे धोक्याचे असल्याने मालवण पोलीसांनी होडीवरील तळाशील ग्रामस्थ व कामगार यांच्याही चर्चा करून होड्या किनारी हलवण्याच्या सूचना केल्या यावेळी ग्रामस्थांनी आधी पंचायदी घाला मग होड्या हलवा अशी भूमिका घेतली होती. यावेळी मालवण पोलिसांनी आपण पकडलेल्या होडीवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागला सांगितले जाणार असून कारवाई होईपर्यंत होड्या तळाशील किनारी ठेवण्याचा निर्णय घेत होड्या किनारी हलवण्यात आल्या. नदीपत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मालवण पोलिसांनी होड्या किनारी हलवण्याचा निर्णय घेतला

दरम्यान ताळशील ग्रामस्थांनी पकडलेल्या होड्यावर कारवाई करण्यासाठी सोमवारी सायंकाळी आचरा तलाठी दाखल झाल्या होत्या यावेळी सहा बंदर निरीक्षक अनंत गोसावी उपस्थित झाले होते यावेळी ग्रामस्थांचा जबाब नोंदविण्यात आला या संपूर्ण कारवाई दरम्यान महसूल प्रशासनाने एकूण दोन वाळू उपसा होड्या व होड्यामध्ये 8 ब्रास वाळू असल्याचे पंचायदीत नमूद करण्यात आले होते. दोन होड्यामधील वाळू व तसेच कामगार तसेच होडी मालकांची माहितीचा चा अहवाल तहसीलदार यांना देऊन त्यानंतर कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.
कालावलं खाडीपत्रातील या होणाऱ्या अनधिकृत वाळू उत्खनन बाबत प्रशासनास वारंवार सांगूनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने अनधिकृत वाळू उत्खननात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणून खाडी किनारी भागाची धूप होऊन किनाऱ्यावरील माड बागायतीचे नुकसान वाढत आहे. घरानां धोका झाला असून ग्रामस्थ यामुळे त्रस्त बनले होते. तसेच काही ठिकाणी वाळू उत्खनन बंदी असलेल्या क्षेत्रातही वाळू उपसा होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

फोटो

1) बंदी भागात वाळू उपसा करणाऱ्या होड्या तळाशील ग्रामस्थांनी पकडल्या होत्या

2) पकडलेल्या होड्यांची पंचायदी घालतना आचरा तलाठी, बंदर अधिकारी

error: Content is protected !!