कलमठ गावातील अंगणवाडी सेविका, आशा व आरोग्य सेवकांनी बांधला बंधारा

ग्रामपंचायत कलमठ ग्रामसभेत गावातील महिला कर्मचाऱ्यानी गावात जलसंवर्धन हेतूने वनराई बंधारा बांधण्याचा संकल्प केला.
आज कलमठ मुस्लिमवाडी येथील पिराच्या सान्यावर महाकाय बंधारा बांधला. यावेळी विभावरी कांबळे, ज्योत्स्ना गुडेकर, प्राची पवार, पुजा हुन्नरे, शर्मिला चव्हाण, राजश्री शिर्के ,सुनिता पाटकर,मनिषा पवार,सुजाता खाजणवाडकर अंगणवाडी सेविका स्मिता सावंत आरोग्य सेविका, चिंतामणी कदम आरोग्य सेवक ग्रामसंघाच्या सोनल लोकरे आदी महिलांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत बंधारा बांधला.





