साने गुरुजींचा जीवन पट उलगडत मुलांना केले मार्गदर्शन

*बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण आयोजित न्यू इंग्लिश स्कूल ,आचरा येथे हेरंब कुलकर्णी यांनी केले मार्गदर्शन

गुरुजी जन्मशताब्दी वर्षानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ,आचरा या ठिकाणी कवी , शिक्षणतज्ञ , समाजसेवक .हेरंब कुलकर्णी यांनी साने गुरुजी जीवनप्रवास विद्यार्थ्यांना विस्तृत स्वरूपात सांगितला . साने गुरुजींचे विद्यार्थी म्हणून वैशिष्टये , विद्यार्थी व शिक्षक प्रसंग , स्वातंत्र्य सेनानी जेल मधील शिक्षा साने गुरुजींचे जेल मधील प्रसंग , अध्यात्मिक व नैतिक विचार लिहलेले पत्रे , वंचितासाठी चे साने गुरुजी कार्य या विषयी सखोल माहिती दिली या व्याख्यानाचा लाभ इयत्ता अकरावी व बारावी वाणिज्य व कला शाखेतील विद्यार्थ्यांनी घेतला . या कार्यक्रमाचे आयोजन इंग्रजी माध्यम शालेय समिती सदस्य मंदार सांबारी यांनी केले . कार्यक्रमाच्या वेळी शाळेचे उपमुख्याध्यापक घुटुकडे सर ,नाथ पै सेवांगण ,मालवण व्यवस्थापक संजय आचरेकर, खजिनदार खंडाळेकर सर ,सौ .प्रतिमा कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ दतात्रय जाधव सर यांनी केले व आभार प्रदर्शन संदीप रावले यांनी केले.
कार्यक्रमासाठी धी आचरा पीपल्स एज्युकेशन मुंबई अध्यक्ष डॉ० प्रदीप मिराशी कार्यअध्यक्ष प्रदीप परब मिराशी ,स्थानिक समिती यांचे सहकार्य लाभले

error: Content is protected !!