बीच क्लिन मशीन द्वारे आचरा किनारा झाला स्वच्छ

जिल्हा परिषद कडून मालवण तालुक्यातील समुद्रकिनारी लगतच्या गावांना वापरण्यासाठी मिळालेल्या बीच क्लीन मशीन द्वारे ग्रामपंचायत आचरा मार्फत पिरावाडी व हिर्लेवाडी भागातील समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबविण्यात येऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्यात आला यावेळी सरपंच जेरान फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पी. जी. कदम, माजी सरपंच डॉक्टर प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य पंकज आचरेकर,पुर्वा तारी,ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!