सिंधुदुर्ग ट्रॅफिक -महामार्ग वाहतूक पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक व्यवस्थापन सहाय्यक म्हणून विद्यार्थ्यांनी केली वाहतूक नियमांची जनजागृती
खारेपाटण महाविद्यालयाच्या एनएसएस विभागाच्या ” दिवाळी विथ माय भारत ” सप्ताहाची सांगता
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून “दिवाळी विथ माय भारत” सप्ताह निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या सप्ताहाच्या सांगता प्रसंगी आज बुधवारी सकाळी ११.०० वाजता महाविद्यालयाच्या एन एस एस विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष खारेपाटण येथील चेक पोस्टला भेट देऊन ट्रॅफिक व्यवस्थापन सहाय्यक म्हणून येथील वाहतूक पोलिसाना मदत करत हेल्मेट वापरणे का गरजे चे आहे याबाबत जनजागृती केली.
भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना,प्रादेशिक संचालनालय, पुणे (महाराष्ट्र आणि गोवा) आणि मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष यांच्या कडून मिळालेल्या निर्देशनानुसार “दिवाळी विथ माय भारत – ये दिवाळी माय भारत वाली” संकल्पनाधिष्ठित स्वच्छता, ट्रॅफिक व्यवस्थापन आणि सेवा से सिखे अंतर्गत २७ ते ३० ऑक्टोबर दरम्यान खारेपाटण येथे जनजागृतीसह विविध उपक्रम राबविण्यात आले.
या स्पताह चे उद्घाटन दि.२७ ऑक्टोबर रोजी प्राचार्य डॉ.ए डी कांबळे यांच्या उपस्थित रॅलीद्वारे स्वच्छता जनजागृती करून करण्यात आले.यावेळी खारेपाटण गावातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. तसेच २८ व २९ ऑक्टोबर रोजी खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर आणि खारेपाटण येथील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता देखील करण्यात आली होती.
तसेच मिळालेल्या निर्देशनानुसार २९ ऑक्टोबर रोजी खारेपाटण प्राथमिक केंद्र येथे प्रमुख डॉ. प्रियांका वडाम – पेडणेकर आणि डॉ. निलोफर जमादार यांच्या उपस्थतीत “सेवा से सेखे – (ई एल पी)” अंतर्गत एनएसएस स्वयंसेवकांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. तर ३० ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग ट्रॅफिक पोलिस – महामार्ग वाहतूक पोलीस हवालदार मंगेश कमाने, जोसेफ डिसोजा, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत कासले.यांच्या उपस्थित आणि मार्गदर्शनानुसार ट्रॅफिक व्यवस्थापनासाठी सहाय्यक ठरत त्यांनी जनजागृती केली ज्या मध्ये हेल्मेट आणि लायसन्स चे महत्व इत्यादी आदींचा समावेश होता.
या सप्ताह निमित्त आयोजित विविध उपक्रमांमध्ये खारेपाटण सरपंच श्रीमती. प्राची इसवलकर, खारेपाटण व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रजाल कुबल,मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कक्ष जिल्हा समन्वयक श्री. वसीम सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी रत्नमाला शेलार, विनिता मोरे, प्रथमेश पाटील, ऋषिल डोंगरकर आणि इतर एनएसएस विद्यार्थ्यांनी यामध्ये सक्रिय सहभाग दर्शिवला होता.
अस्मिता गिडाळे, खारेपाटण